अनामिकता हे आमचे मूळ तत्व आहे.

ज्याला दारूपासून दूर राहण्याची इच्छा आहे
अशा प्रत्येक मद्यपीडिताचे मी स्वागत करतो...
तसेच शांती, स्थिरता आणि आनंद हवे आहे
अशा मद्यपीडिताच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे मी स्वागत करतो.
आम्ही गव्हर्न्मेंट रजिस्टर्ड सामाजिक सेवा उपक्रम केंद्र आहोत.

कौन्सेलिंग दोन स्वरूपात उपलब्ध आहे
ऑनलाइन लाईव्ह आणि प्रत्यक्ष

एकट्याने शक्य नाही...
पण सोबत शक्य आहे.

मद्यपाश म्हणजे काय?

मद्यपाश हा जगातील तिसरा सर्वात वेगाने वाढणारा प्राणघातक आजार आहे.
डब्ल्यू एचओ आणि ए एम ए यांनी मद्यपाश हा आजार म्हणून घोषित केला आहे.
मद्यपाश ही एक शारीरिक अ‍ॅलर्जी आहे जी मानसिक आकर्षणाशी जोडलेली आहे.
मद्यपाश हा नकार, अस्वस्थता, मतभेदाचा आजार आहे.
मद्यपाश हा 200 हून अधिक शारीरिक आजारांचे कारण आहे आणि त्यापैकी 37 आजार दीर्घकालीन आहेत.
जगभर घडणाऱ्या सर्व गुन्ह्यांपैकी ३५% गुन्हेगारी कृत्यांमध्ये मद्यपाश आजार कारणीभूत असतो.

मद्यपाश हा आजार वैद्यकीयदृष्ट्या अद्याप बारा होऊ शकत नाही, परंतु त्यातून मुक्तता शक्य आहे.

मद्यपाशातून बरे होण्यासाठी मदत घेणे का आवश्यक आहे?

मद्यपाश हा नकाराचा आजार आहे.
मद्यपाशामुळे व्यक्तिमत्व विकार निर्माण होतो. मद्यपी व्यक्ती मानसिक पातळीवर होणारे हे बदल समजू शकत नाही.

मद्यपाश हा कौटुंबिक आजार आहे. कुटुंबातील एक किंवा अधिक मद्यपी नकळत कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये समान मानसिक स्थिती निर्माण करू शकतात. 

मद्यपाश हा भ्रमाचा आजार आहे. ही व्यक्ती वेडयासारखी का वागतेय?
या प्रश्नाने लोक नेहमीच गोंधळात पडलेले दिसतात.

कारण मद्यपाश हा सर्वात धोकादायक आजार आहे. का?
कारण, इतर सर्व आजारांची लक्षणे आधी दिसतात.
पण मद्यपाश या आजाराची लक्षणे आजार बळावल्यानंतर दिसू लागतात..

चांगली बातमी अशी आहे की... मदत उपलब्ध आहे.
तुम्हाला फक्त ती स्वतःच्या इच्छेने स्वीकारावी लागेल.

हे लक्षात घ्या

या गोष्टी विसरून जा

मद्यपाश हा पाप आहे
चूक
मद्यपाश हा शाप आहे
चूक
मद्यपाश हे पूर्वजन्म कर्म आहे
पूर्णपणे चूक
मद्यपान भूतबाधेमुळे होतो.
पूर्ण अंधश्रद्धा

या गोष्टी करा

प्रामाणिकपणा ही गुरुकिल्ली आहे.
मोकळे मन हे प्रवेशद्वार आहे.
इच्छाशक्ती द्वार उघडते .

प्रामाणिक रहा. मोकळे मन ठेवा. मानाने तयार राहा. मग तुम्ही जिंकाल.

पंख उघडून भरारी घ्या

जबरदस्तीचे कर्मकांड नाहीत.
अवाजवी बंधने नाही.
पुस्तकी बडबड नाही.
भेदभाव अजिबात नाही.

सबळ व्यावहारिक अनुभव.
तुमचा देव निवडण्याचे स्वातंत्र्य.
तुमच्या गतीने कृती करण्याचे स्वातंत्र्य.
स्वतःला स्वीकारण्याचे स्वातंत्र्य.
कृती हा जादूई शब्द आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे

निनांवीपणा हा सेवांचा पाया आहे.

मद्यमुक्तीसाठी माझ्या सेवा कशा उपयुक्त आहेत?

माझ्या कुटुंबातही
एक मद्यपी होता...

मी आणि माझा परिवार, कुटुंबातील एका सदस्याच्या मद्यपानाने गेल्या 30 वर्षांपासून त्रस्त होतो. कुटुंबात एखादा मद्यपी सदस्य असल्यावर काय होते हे मला अगदी चांगले माहिती आहे. मी सर्व प्रकारची बदनामी, वेदना, अपमान, शक्तीहीनता, राग, निरुपयोगीपणा, असहाय्यता अनुभवली आहे, जी प्रत्येक मद्यपी व्यक्तीचे कुटुंब अनुभवते.
मी त्याचे कर्ज फेडून थकलो होतो, कायदेशीर परिणामांचा सामना करत होतो आणि लोक त्याला त्रास देत होते. त्याच्या कृती आणि वागण्याने मी कंटाळलो होतो.
माझी मनस्थिती द्विधा झाली होती. कुटुंबातील मद्यपी व्यक्तीला इतरांप्रमाणे वाळीत टाकायचे, की त्याला दारू पिण्यापासून मुक्त होण्यास मदत करायची यापैकी एकाची निवड करणे आवश्यक होते. मी दुसरा पर्याय निवडला. मी मदत करण्याचा निर्णय घेतला.

मी द्वेष करण्याऐवजी...
मदत करणे निवडले

मी एका धार्मिक, समाजमान्य आणि कर्मठ कुटुंबातील आहे. माझ्या कुटुंबात, पिढ्यानपिढ्या एकही मद्यपी किंवा व्यसनी नव्हता. एखाद्या मद्यपीबद्दल तुम्हाला जसे वाटते तसेच आम्हालाही वाटले.
पण मी मदत करण्याचा निर्णय घेतला. मी अभ्यास केला, अनुभव घेतला आणि या निराशेच्या आजाराचा शोध घेतला. शेवटी मला मार्ग सापडला... सर्व जगिक आध्यात्मिकतेचा काही उपयोग नव्हता. पण मला मदत करण्यासाठी अल्को-स्पिरिच्युअल जीवनशैली मिळाली. माझ्या कुटुंबातील मद्यपी सदस्यासाठी त्याचा उपयोग झाला.
तो मद्यमुक्त झाला. आता माझ्या कुटुंबातील सदस्य दारूपासून मुक्त आहे.
नेमकी काय मदत करावी, कशी मदत करावी, कधी मदत करावी, कोणाला मदत करावी आणि का मदत करावी हे, मला नेमके माहित आहे.

दिल्या जाणाऱ्या सेवा

अल्को-स्पिरिच्युअल रिकव्हरी कौन्सेलिंग

अल्को-स्पिरिच्युअल रिकव्हरी कौन्सेलिंग हा मद्यपींना बरे होण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे.
कौन्सेलिंग सेशन्स गोपनीय ठेवली जातात.
कोणत्याही संभाषणाची माहिती इतर कोणालाही कधीच दिली जात नाही.
आवश्यक सेशन्स : ७ ते १५
(गरजेनुसार जास्तीची सेशन आयोजित केली जाऊ शकतात)

सेवा मानधन रु. 450 प्रति सेशन पासून सुरू | 30 मिनिट

अल्को-स्पिरिच्युअल कपल कौन्सेलिंग

अल्को-स्पिरिच्युअल कपल कौन्सेलिंग चा उपयोग वैवाहिक संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी होतो. कौन्सेलिंग सेशन्स गोपनीय ठेवली जातात.
कोणत्याही संभाषणाची माहिती इतर कोणालाही कधीच दिली जात नाही.
आवश्यक सेशन्स : ५ ते १२
(गरजेनुसार जास्तीची सेशन आयोजित केली जाऊ शकतात)

सेवा मानधन रु.1450 प्रति सेशन पासून सुरू | 60 मिनिट

अल्को-स्पिरिच्युअल फॅमिली कौन्सेलिंग

अल्को-स्पिरिच्युअल फॅमिली कौन्सेलिंग हे कुटुंबातील जवळच्या सदस्यांना एकता, प्रेम आणि समजूतदारपणा परत मिळवून देण्यासाठी उपयोगी आहे.
कौन्सेलिंग सेशन गुप्त ठेवली जातात.
कोणतेही संभाषण कधीही इतर कोणालाही उघड केले जात नाही.
आवश्यक सेशन : 5 ते 12
(गरजेनुसार जास्तीची सेशनआयोजित केली जाऊ शकतात)

सेवा मानधन रु.1450 प्रति सेशन पासून सुरू | 60 मिनिट

अल्को-स्पिरिच्युअल एस. ई. एल. एफ. एस. मॅनेजमेंट

अल्को-स्पिरिच्युअल एस. इ. एल. एफ. एस. कौन्सेलिंग : लैंगिकता, भावनिकता, एकाकीपणा, आर्थिकता, सामाजिक मानसिकता सामान्य करण्यास मदत करते.
कौन्सेलिंग सेशन्स गोपनीय ठेवली जातात.
कोणतेही संभाषण दुसऱ्या कोणासमोर कधीच उघड केले जात नाही.
आवश्यक सेशन : 5 ते 12
(गरजेनुसार जास्तीची सेशन आयोजित केली जाऊ शकतात)

सेवा मानधन रु.750 प्रति सेशन पासून सुरू | 40 मिनिट

अल्को-स्पिरिच्युअल जी. आय. आर. डी. मॅनेजमेंट

अल्को-स्पिरिच्युअल जी.आय.आर.डी. कौन्सेलिंगमुळे अपराधीपणाची भावना, चिडचिड, अस्वस्थता आणि असंतुष्टपणा यांची व्यवस्थापन क्षमता प्राप्त करण्यास मदत होते.
कौन्सेलिंग सेशन्स गोपनीय ठेवली जातात.
कोणतेही संभाषण दुसऱ्या कोणासमोर कधीच उघड केले जात नाही.
आवश्यक सेशन : 5 ते 12
(गरजेनुसार जास्तीची सेशनआयोजित केली जाऊ शकतात)

सेवा मानधन रु. 750 प्रति सेशन पासून सुरू | 40 मिनिट

अल्को-स्पिरिच्युअल एफ. इ. ए. आर. मॅनेजमेंट

अल्को-स्पिरिच्युअल एफ.ई.ए.आर. कौन्सेलिंग. भीती, अहंकार, खुन्नस आणि संताप हे मद्यपीडित आणि मद्यपीच्या कुटुंबातील सदस्यांचे चार घातक शत्रू आहेत.
मी व्यावहारिक कृतीवर विश्वास ठेवतो म्हणून, सर्व प्रकारचे कौंससीलिंग सेशन "कृती" या तत्वावर आयोजित केले जातात.
आवश्यक सेशन : 5 ते 12
(गरजेनुसार जास्तीची सेशनआयोजित केली जाऊ शकतात)

सेवा मानधन रु. 750 प्रति सेशन पासून सुरू | 40 मिनिट

एस जी नायक (साहिल दा)

कॉन्सर्टर.ऑथर.लेक्चरर.मेंटॉर.

जीवन सुंदर आहे. जगणे ही जीवन सुंदर बनवण्याची प्रक्रिया आहे. आणि... तुमचे जीवन सुंदर बनवणे दररोज महत्वाचे आहे.

एस जी नायक (साहिल दा)

कॉन्सर्टर.ऑथर.लेक्चरर.मेंटॉर.

कृतीद्वारे प्राप्त पात्रता :

  • कुटुंबातील एका मद्यपीडित सदस्यांमुळे मी स्वतः 30 वर्षे यातना भोगल्या आहेत.
  • माझ्या यशस्वी समुपदेशन आणि सहाय्यामुळे माझ्या कुटुंबातील मद्यपीडित सदस्याला मद्यपाशाच्या आजारातून बरे होण्यास मदत झाली.
  • मी अल्को-रिकव्हरी कौन्सिलर आणि अल्को-स्पिरिच्युअल मेंटॉर म्हणून यशस्वीरित्या मद्यपीडित आणि त्यांच्या कुटुंबांना सेवा प्रदान करत आहे.

पूर्वी अधिग्रहित केलेल्या पात्रता :

टॉप रँकर सिंगर : भारतीय सुगम संगीत (बीएसपीएमचे गांधर्व महाविद्यालय) |
हाय ऑनर अध्यापक :
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (शंकर महादेवन अकादमी)
डिप्लोमा
ग्राफिक डिझायनिंग | डिप्लोमा वेब डिझायनिंग | मानसशास्त्र विद्यार्थी (वायसीएमओयू )
धार्मिक : रुग्वेद | आध्यात्मिक : सत्व-आकर्षण, केनोसिस ध्यान

सध्याची कार्यक्षेत्रे :

  • अल्को-रेव्हलेशन कॉन्सर्ट (आर्क): “लव्ह युवर जिंदगी” (मद्यपाश आजार आणि मुक्तता )
  • अल्को-रिकव्हरी कौन्सेलिंग : मद्यमुक्ती, कौटुंबिक एकता, वैवाहिक दुरावा, जीआयआरडिएस, एफईएआर,एचएएलटीएस
  • अल्को-स्पिरिच्युअल मेंटॉर : पर्सनल सॅनिटी | फॅमिली युनिटी | सोशल अमिटी | स्पिरिच्युअल इंटेग्रिटी
  • अल्को-रिऍलिटी कंपोझर : प्रत्येकासाठी सत्य व्यक्त करणारी अल्को-रिऍलिटी बुक्स

पूर्व कार्य क्षेत्रे : (32 वर्ष)

राइटिंग, सिंगिंग, एक्टिंग, संकीर्तन, व्हॉईस आर्टिस्ट, स्पीकर, एडिटर (न्यूज़), डिझाईनिंग, स्पिरिचुअल एडवाइजर, मार्केटिंग, जिंगल राइटर, इवेंट डिज़ाइनर

मी कोणताही पक्षपात न करता सेवा देण्यासाठी उपलब्ध आहे.

सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत माझ्याशी संपर्क साधा.

कौन्सेलर एस जी नायक, सुरभी, कलानगर, नाशिक 422009. महाराष्ट्र भारत.

Scroll to Top